Bay -team aavaj marathi
✍🏻प्रज्ञानंद जाधव तालुका प्रतिनिधी (नांदगाव)
नांदगाव येथील भारतीय स्टेट बैंक शाखेत आपल्या जवळील रक्कम जमा करण्यासाठी आज दुपारी तांदूळवाडी येथील काळे कुटुंबातील आजी आजोबा आले असता, त्यांना हृदय विकाराचा झटका आल्याचे सुरक्षा रक्षक चव्हाण यांच्या लक्षात आले.
सविस्तर वृत्त असे की बाळासाहेब देवचंद काळे हे आपल्या पत्नी सोबत सौ सिंधूताई बाळासाहेब काळे या आपला नंबर आल्याने जाण्यासाठी उभे राहत असतांना आजीबाईंस अचानक पणे चक्कर आल्याने ते कोसळल्या आजी वृद्ध असल्याने शरीराने साथ सोडली असावी असा अंदाज आल्याने जवळच असलेल्या स्टेट बैंकेतील सुरक्षा रक्षक रवींद्र नाना चव्हाण यांना समजले त्यांनी तातडीने त्यांच्याकडे धाव घेतली असता आजीचे हात पाय थंड पडल्याने व शरीर साथ देत नसल्याने रवींद्र चव्हाण यांनी बँकेचे मॅनेजर यांना कळवले व तातडीने प्रथम उपचार करण्यास सुरवात केली असता आजीने प्रतिसाद दिला असता आजींचा जीव वाचला आहे हे बघुन तातडीने ग्रामीण रुग्णालय येथे संपर्क करून रुग्णवाहिकेतून
बैंकेतील कर्मचारी वृंद यांनी मदत करत त्यांना रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी हृदय विकाराचा झटका असल्याचे संकेत असल्याचे सांगितले होते! अशी माहिती बॅंकेतील सुरक्षा रक्षक रवींद्र नाना चव्हाण यांनी सांगितली आहे.
तसेच आजींची प्रकृती ठीक असल्याने मृत्युच्या दारातून रवींद्र चव्हाण यांनी माझ्या पत्नीला ओढून आणल्याने आजोबा बाळासाहेब काळे यांनी आपल्या मुलाला सचिन काळे याला सोबत घेऊन बैंकेचे मॅनेजर वीरेंद्र विक्रम यांना लेखी स्वरूपात लेखन करून सर्व कर्मचारी यांचे आभार मानले आहे.आजीचे प्राण वाचल्याने स्टेट बँकेचे मॅनेजर यांच्यासह कर्मचारी वृंद व शहरातील विविध संघटनानी मित्र परिवाराने कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, यांनी चव्हाण यांचे कौतुक करुन शॉल देऊन चांगल्या कामाचा सत्कार देखील केला आहे.
0 Comments