मनमाडचे भूमिपुत्र हिरामण मनोहर यांना मानद डॉक्टरेट पुरस्कार जाहीर

 Bay- team aavaj marathi 

प्रज्ञानंद बापू जाधव पत्रकार नांदगाव [नाशिक]

मनमाडचे भूमिपुत्र हिरामण मनोहर यांना नुकताच सामाजिक कार्याचा मानद डॉक्टरेट २०२५ पुरस्कार महात्मा गांधी पीपल्स अवार्ड कौन्सिल पालघर महाराष्ट्र या परिषदेचे डॉ.विरेंन्द भोईर यांच्या वतीने "मानद डॉक्टरेट" पुरस्कार जाहीर करण्यात आला.गेल्या चौदा ते पंधरा वर्षा पासून हिरामण मनोहर यांनी दिव्यांग सेवेसोबत समाज सेवा, रुग्ण सेवा, मनोरूग्ण सेवा व वृध्द कलावंत सेवा करत असतात समज प्रबोधनपर अनेक लघुपटांची निर्मिती केली आहे.त्यांना मिळालेल्या  पुरस्कारामुळे त्यांच्या हितचिंतकांकडुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कोरोना काळात अन्नदान,माक्स वाटप,किरणा वाटप तसेच प्रत्येक मोहल्ल्यात जाऊन कोरानाचे नियम पाळण्यासाठी जनतेला आव्हान करणे.अशा सर्व समाजसेवेची दखल घेत सामाजिक व चित्रपट क्षेत्रातील कार्याचा गौरव म्हणून मानद डॉक्टरेट २०२५ चा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पुरस्कार प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून २६ जानेवारी २०२६ रोजी ऑनलाईनने प्रदान केला जाणार आहे. मला आत्ता पर्यंत विविध संस्थे कडुन अनेक पुरस्कार मिळाले आहेत परंतु हा मानाचा मानद डॉक्टरेट पुरस्कार माझ्यासाठी महत्वाचा व मोलाचा आहे.असे मत डॉ.हिरामण मनोहर यांनी आवाज मराठी न्यूज नेटवर्क प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले..

Post a Comment

0 Comments