शिव छत्रपतींचे कार्य पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी

 Bay- team aavaj marathi 

एकनाथ भालेराव पत्रकार येवला (नाशिक) 

आज दि. १९ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जि. प. प्राथमिक शाळा महादेववाडी (सायगाव) येथे उत्साहात साजरा करण्यात आली. सर्वप्रथम बाल शिवाजी व वेशभूषेत आलेल्या विद्यार्थ्यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भाऊसाहेब ढाकणे, सदस्य नानासाहेब उशीर, ग्रामस्थ सुनील मुळे, पत्रकार एकनाथ भालेराव, मुख्याध्यापक देविदास जानराव सर यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.शाळा छोटी असली तरी  चिमुकल्यांचा उत्साह मोठा होता. गावात उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी शिवरायांवर आधारित भाषणे व विविध गीतांचे गायन केले. इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी शिवरायांचा जन्मोत्सव दाखवण्यासाठी सुंदर अशा नृत्याचे सादरीकरण केले. या गाण्यांसाठी पालकांनी बक्षिसे पण दिली. जानराव सर यांनी महाराजांविषयी माहिती संगीतली. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केलेली घोडदळ, पायदळ सैनिक, त्यांनी उभारलेले आरमार दल, त्यांचा कारभार हा आजच्या भारताच्या चालू असलेल्या कारभाराचा पाया आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील शिवाजी महाराजांच्या कारभाराला प्रेरणा मानून घटनेची निर्मिती केली. कारभार करत असताना प्रत्येक मावळ्यांचे गुण बघून त्यांना त्या त्या कारभाराचे प्रमुख बनवले. त्यांचे अष्टप्रधान मंडळ हे त्यातील एक उत्तम उदाहरण असल्याचे देखील जानराव सर यांनी सांगितले. अनेकांना वाटते की शिवाजी महाराज हे राजा म्हणूनच जन्माला आले. पण एका सरदाराचा मुलगा जन्माला आल्यानंतर त्याला जिजाऊने असे घडवले की त्याला रयतेचे राज्य म्हणजेच स्वराज्य घडवण्याचे स्वप्न दिसू लागले व ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात जिवाभावाचे मावळे मित्र घेऊन स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली आणि विराट मराठे वीर दौडले सात. आणि त्यांच्यात जणू शिवशंभू संचारले आणि त्यांच्या पन्नास वर्षाच्या हयातीत साडे तीनशे किल्ले मिळवले. व आपले स्वतंत्र असे स्वराज्य स्थापन केले.

 दरम्यान त्यांना सिंहासारखे अनेक योद्धे मावळे गमवावे लागले. परंतु ते आपल्या धेय्यापासून कधीच मागे हटले नाही. ते लढत राहिले फक्त रयतेसाठी आणि रयतेच्या राज्यासाठी म्हणजेच आपल्या स्वराज्यासाठी. शिवाजी महाराजांचे अनेक गुण आहे ते आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी राहतील असे देविदास जानराव सरांनी सांगितले.

आपल्या आभार भाषणातून श्रीम शारदा आहिरे मॅडम यांनी सांगितले की, प्रत्येकाला वाटते शिवाजी महाराज जन्माला यायला हवे. पण त्यासाठी आगोदर जिजाऊ ला अवतार घ्यावा लागेल. अनेक प्रतिकूल परिस्थिती असतानाही शहाजी राजांना अनेक स्वाऱ्यांवर जावे लागत होते. या धामधुमीच्या काळात देखील न डगमगता शिवाजी महाराजांना संस्काराचे बाळ कडू पाजून सक्षम राजा बनवले. जिजाऊंचे देखील योगदान स्वराज्यासाठी खूप मोलाचे ठरले. हे राज्य रयतेचे व्हावे ही श्रींची इच्छा असे छत्रपती शिवाजी महाराज गर्वाने म्हणत होते. श्रीम.आहिरे मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त करून उपस्थित त्यांचे आभार मानले. कार्यक्रमासाठी महिला व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करून बहारदार होण्यासाठी श्रीम. शारदा अहिरे मॅडम, युवा कार्य प्रशिक्षणार्थी अरुण जानराव व मुख्याध्यापक देविदास जानराव सर यांनी मेहनत घेतली.

Post a Comment

0 Comments