दि -19 फेब्रुवारी रोजी नांदगाव येथील सौ.क.मा. कासलीवाल माध्य.विद्यालयात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.या प्रसंगी मुख्याध्यापक सर्वश्री शरद पवार, विशाल सावंत,मनी चावला,गोरख डफाळ, इ.मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी माहिती दिली व उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या पराक्रमाचे वर्णन करणारा पोवाडा सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक शरद पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जातीधर्मातील माणसांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले. छत्रपतींनी स्वराज्यासाठी आखलेली धोरणे, प्रशासन, युध्दनिती, सुसंघटन, रयतेच्या कल्याणासाठी केलेले कार्य आजही प्रेरणादायी आहे.महाराजांचा एकतरी गुण प्रत्येकाने आत्मसात करावा असे आवाहन मा.मुख्याध्यापक शरद पवार यांनी केले. व विविध गुणांचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला.
संस्थेचे चेअरमन मा. सुनीलकुमार जी कासलीवाल तसेच उपाध्यक्ष सुशील कासलीवाल, सचिव विजय चोपडा, प्रशासक प्रकाश गुप्ता, सहसचिव प्रमिला ताई कासलीवाल,विश्वस्त रिखबचंद कासलीवाल,जुगलकिशोर अग्रवाल, महेंद्र चांदिवाल, आनंद कासलीवाल यांनी शिवजयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक सर्वश्री शरद पवार, विशाल सावंत,मनी चावला, गोरख डफाळ तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप आहेर यांनी तर विजय गायकवाड यांनी आभार व्यक्त केले.
0 Comments