Bay-team aavaj marathi
सिताराम पिंगळे सर पत्रकार नांदगाव (नाशिक)
नांदगाव येथील मराठा विद्या प्रसारक समाजाचे होरायझन अकॅडमीत स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नांदगाव पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी भूषविले. यावेळी व्यासपीठावर शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य रामनाथ गायकवाड, रविकांत पाटील डॉ.गणेश चव्हाण, राहुल फोफलिया, विशाल वडघुले, होरायझन अकॅडमीच्या प्राचार्या पी. डी. मढे, औ.प्र.संस्थेचे प्राचार्य के.पी. जाधव, डॉ.पी.व्ही. पगार,प्रा.बी.के पवार, डी.एम भिलोरे, राजेंद्र काकळीज,एम.जी जाधव,धनराज काकळीज आदी मान्यवर होते.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे व माता सरस्वती यांचे पूजन करून झाली. तसेच प्रास्ताविक भाषण प्राचार्या पुनम मढे यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाविषयी माहिती सांगितली. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असलेले पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याबद्दल माहिती दिली. विद्यार्थ्यांनी छत्रपतींच्या कार्याचा आदर्श घ्यावा असे ते आपल्या भाषणात म्हणाले. नंतर विशाल वडघुले यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी विद्यार्थ्यांनी भाषण, गीत पोवाडा नृत्य आदी सादर केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त यावर्षी पालकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी विशेष स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात पालकांसाठी किल्ला बांधणी स्पर्धा, महिला पालकांसाठी रांगोळी स्पर्धा आदींच्या आयोजन करण्यात आलेले होते. तसेच विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, रंग भरणं स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, पोवाडा गायन यांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विविध शाळेतून विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना मराठा विद्या प्रसारक समाजाचे नांदगाव तालुका संचालक इंजि.अमित बोरसे-पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.
तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त एक आदर्श कार्यक्रम आयोजित केल्याने त्याचा फायदा तालुक्यातील विद्यार्थ्यांना व पालकांना झाला. या आयोजनाबद्दल शाळेचे सर्वत्र कौतुक होत आहे. कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, पालक, स्पर्धक व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमासाठी शाळेचे सर्व शिक्षक शिक्षिका आणि शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.
0 Comments