नांदगावात डोळ्याचे पारणे फेडनारा भव्य दिव्य शिवजन्मोत्सव साजरा

 Bay- team aavaj marathi 

भरत पारख पत्रकार नांदगाव (नाशिक)

 नांदगाव शहरात आ. सुहास आण्णा कांदे यांच्या माध्यमातून आशिया खंडातील सर्वात मोठ्या साकारलेल्या शिवसृष्टीमुळे राज्यात शहराचे नाव चर्चेत येत आहे.याच पार्श्वभूमीवर यंदा सार्वजनिक शिवजयंती धुमधडाक्यात साजरी करण्याचे नियोजन यावेळी आ.सुहास आण्णा यांच्या मार्गदर्शनाखाली शिवजयंती उत्सव समितीच्या नियोजनाने शहरातील नागरिकांनी बुधवार दि.१९ रोजी अतिशय रोमांचकारी,ऊर भरून येणारा आणि प्रत्येक मावळ्यांचा आनंद द्विगुणित करणारा शिवजन्मोत्सव सोहळा अनुभवला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सालाबादप्रमाणे यंदाही १९ फेब्रुवारी रोजी आगळ्या वेगळ्या पद्धतीने आणि शहरातील नागरिकांना स्मरणात राहील असा शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्याचे आ सुहास अण्णा यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत करण्याचे ठरल्यानंतर सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सुनील जाधव व समितीचे सर्व पदाधिकारी, सदस्य आठ दिवसापासून नियोजन करत होते. त्याप्रमाणे मिरवणुकीत भारतीय संस्कृती दर्शवणारे विविध देखावे तसेच मैदानी खेळ प्रात्यक्षिकांसह मराठी सांस्कृतिचे दर्शन घडविणारे अनेक खेळ, कलापथक, घोडे, शिवकालीन जिवंत देखावे, नृत्य, महाकाल, महाकाली, बाल भजनी मंडळ, याव्यतिरिक्त महाकाल, हनुमान, महाकाली,तसेच कोळी नृत्य, पंजाबी नृत्य, अंबाबाई, गोंधळी, बाल भजनी मंडळ, चार घोड्यांचा भालदार चोपदार, घोड्यांच्या रथात विराजमान छत्रपती शिवाजी महाराज अशा विविध नटलेल्या पारंपारिक वेशभूषेत असलेल्या कलाकारांच्या उपस्थितीने उत्सवाला रौनक आली. यासोबत नाशिक ढोल आणि डीजेच्या तालावर नाचणारे मावळे, फटाके फोडत आनंद साजरा करत होते.


पहिल्यांदा घराघरातून सहकुटुंब आपल्या लहान मुला बाळांसह नांदगावकर शिवजयंती साजरी करण्यासाठी शिवसृष्टी येथे उपस्थित होते. या ठिकाणी येथे मोठ्या प्रमाणात रोषणाई करण्यात आली होती. उत्सवाच्या दिवशी सकाळी शिवस्फूर्ती येथील महाराजांच्या पुतळ्यास यावेळी युवा सेना तालुकाप्रमुख सागर भाऊ हिरे यांच्या हस्ते दुग्धाभिषेक करून पूजा करण्यात आल्यानंतर शेकडो शिवप्रेमींनी बाईक रॅली काढण्यात आली होती.
शिवजन्मोत्सवास उपस्थित शिवप्रेमींचे समितीच्या वतीने युवा सेना जिल्हाप्रमुख फराहन दादा खान यांनी स्वागत केले. 

सायंकाळी सहा वाजता आ. सुहास अण्णा कांदे व सौ अंजुम ताई कांदे यांच्या उपस्थितीत शिवस्फूर्ती मैदान येथून शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली यात हजारोंच्या संख्येने शिवप्रेमींनी सहभाग घेतला होता.आ.सुहास अण्णा व सौ.अंजुमताई कांदे यांनी यावेळी महाआरतीचा लाभ घेतला. यानंतर चौफेर प्रचंड प्रमाणात रंगीबेरंगी आतिषबाजी करण्यात आली. याप्रसंगी शिवसृष्टीचा परिसर शिवप्रेमींनी तुडूंब भरलेला होता. शिवसृष्टी साकारण्यात आल्यानंतर मोठ्या उत्साहात शिव जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याने कायम स्मरणात राहील, असा डोळ्याचे पारणे फेडनारा सोहळा बघावयास मिळाल्याने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.


 


Post a Comment

0 Comments