बेहेड गावी संघर्ष महिला ग्राम संघ मीटिंग व हळदी कुंकू मोठ्या उत्साहात पार पडला.

 Bay- team aavaj marathi

सचिन बैरागी पत्रकार नांदगाव (नाशिक)

निफाड तालुक्यातील बेहेड गावी संघर्ष महिला ग्राम संघ मीटिंग व हळदी कुंकू मोठ्या उत्साहात पार पडला. या वेळी बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यां हळद कुंकू कार्यक्रम दरम्यान वैयक्तिक व्यवसाय चळवळ बँक लिंकेज आरोग्याबद्दल चर्चा करण्यात आली.

प्रकल्प संचालक DRDA - प्रतिभा संगमनेरे, उमेद - तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष स्टाफ, गावात महिलांना त्यांच्या हक्काचा मिटिंग हॉल मिळवून देण्यासाठी बेहेड गावचे सरपंच मा.गोरख देवकर यांनी विशेष प्रयत्न करत बचत गट महिलांसाठी मीटिंग हॉल मिळून दिला याबद्दल सरपंच देवकर यांचे बचत गटाच्या महिलांनी आभार मानले.तसेच ग्रामसेवक तरवारे उज्वल प्रभाग संघ, संघर्ष ग्रामसंघ पदाधिकारी यांचे देखील बचत गटांच्या महिलांनी आभार मानले.या कार्यक्रमासाठी CRP अश्विनी बैरागी, योगिता बैरागी, अरुणा बागुल, आशा कराटे,शारदा परदेशी, भारती सुहास मोरे,संगिता राऊत, अनिता ताई आदि.उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments