श्री. एम.जे.कासलीवाल एज्युकेशन ट्रस्ट संचलित सौ.क.मा. कासलीवाल माध्यमिक विद्यालयात 28 ते 30 जानेवारी या दरम्यान तीन दिवसीय शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. क्रीडा स्पर्धांचे उदघाटन मुख्याध्यापक सर्वश्री शरद पवार, विशाल सावंत ,गोरख डफाळ, प्रिन्सिपॉल मनी चावला यांच्या हस्ते करण्यात आले.
विद्यालयातील विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद यावेळी मिळाला. शालेय क्रीडा प्रकारामध्ये कबड्डी, खो-खो, 100 मीटर धावणे, 200 मीटर धावणे, रिले शर्यत,शुटिंग बॉल, इत्यादी खेळांचे आयोजन केले होते.याक्रीडा सामन्यांचे पंच म्हणून विद्यालयातील शिक्षक राहुल आहेर, केतन दळवे,मनोज व्हरगीर, अनिकेत राऊत,मनोज साळुंखे यांनी काम पाहिले.
तर गुणलेखक म्हणून रवींद्र चव्हाण,हर्षदा भालेराव, रुपाली, मालकर, योगिता गायकवाड, सोनाली बोडखे पल्लवी काकळीज यांनी काम पाहिले. क्रीडा स्पर्धांचे धावते समालोचन विद्यालयाचे मुख्याध्यापक शरद पवार, संजय शिवदे, विजय गायकवाड यांनी केले. स्पर्धा समाप्ती नंतर विजेत्या सर्व विद्यार्थी खेळाडूंना प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली.
याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना मुख्याध्यापक शरद पवार यांनी शिक्षणाबरोबरच खेळाकडे ही लक्ष दिले पाहिजे. खेळातून आरोग्य, पैसा,व नोकरी देखील मिळू शकते म्हणून खेळाकडे करिअर च्या दृष्टिकोनातून ही पाहिले पाहिजे असे प्रतिपादन केले. संस्थेचे चेअरमन मा. सुनीलकुमार जी कासलीवाल तसेच उपाध्यक्ष सुशील कासलीवाल, सचिव विजय चोपडा, प्रशासक प्रकाश गुप्ता, सहसचिव प्रमिलाताई कासलीवाल,विश्वस्त रिखबचंद कासलीवाल,जुगलकिशोर अग्रवाल, महेंद्र चांदिवाल, आनंद कासलीवाल, यांनी क्रीडा स्पर्धेतील विजेत्या संघांचे तसेच सर्व खेळाडूंचे व क्रीडा शिक्षकांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
सदर क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्रीडा शिक्षक संजय त्रिभुवन यांच्यासह विद्यालयातील शिक्षक गोरख डफाळ,संजय शिवदे,राहूल आहेर, संदीप आहेर,रवींद्र चव्हाण, विजय गायकवाड, विजय जाधव,मनोज साळुंखे,केतन दळवे, मनोज व्हरगीर,रिझवान मन्सुरी, देविदास चव्हाण,हर्षदा भालेराव , रुपाली मालकर ,योगीता गायकवाड ,सोनाली बोडके, यांनी विशेष मेहनत घेतली.
0 Comments