जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न......

 Bay-team aavaj marathi 

मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)

दि.1 फेब्रुवारी रोजी, नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. वार्षिक क्रीडा महोत्सवा अंतर्गत विविध खेळांचे आयोजन यावेळी करण्यात आले होते. यामध्ये कबड्डी, खो-खो, रनिंग रेस, डॉजबॉल, मेडिसिन बाॅल, लिंबू चमचा, पोते उडी इ. या खेळामध्ये विद्यार्थांनी आपले कौशल्य दाखवीत मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला.
 या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सौ.क.मा.कासलीवाल प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अनुक्रमे श्री.विशाल सावंत,गोरख डफाळ, शरद पवार उपस्थित होते. सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत स्कूल चे प्राचार्य श्री. मनी चावला यांनी केले .कार्यक्रमाची सुरुवात सरस्वतीच्या प्रतिमा पूजनाने  करण्यात आली. यानंतर शालेय क्रीडा शिक्षक अशोक बागूल यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता चौथी व आठवी, नववीच्या विद्यार्थ्यांनी रेड, ग्रीन, ब्ल्यू, यलो या हाऊस प्रमाणे संचलन केले. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुंदर असे नृत्य सादर केले.

आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली.यातून विद्यार्थ्यांनी "सेव ट्री सेव नेचर" त्याचबरोबर कराटेच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकातून "महिला सबलीकरणाचा" संदेश देवू केला. तसेच वेगवेगळ्या खेळात विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना शाळेचे प्राचार्य श्री मणी चावला यांनी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देवू केली. या मध्ये 'रेड हाउस' प्रत्येक खेळात अवल ठरला.रेड हाउचे कॅप्टन आदिती आहेर व अर्थव येवले यांना प्रमुख पाहुण्याच्या हस्ते ट्राॅफी देवून सन्मानित करण्यात आले. त्याच बरोबर सोनिया जोशी, तस्निम भारमल, निलेश पाटील, शैलेंद्र दामले,पवार या शिक्षकांना बेस्ट टिचर अवॉर्ड देवून सन्मानित करण्यात आले.

सर्व विजयी खेळाडूना संस्थेचे चेअरमन मा. श्री. सुनिल कुमार जी कासलीवाल तसेच संस्थेचे सेक्रेटरी विजय चोपडा, सौ. प्रमिलाताई कासलीवाल, जुगलकिशोर अग्रवाल,रिखबकाका कासलीवाल,महेंद्रभाऊ चांदिवाल, सुशिल भाऊ कासलीवाल, प्रिन्सिपॉल मणी चावला तसेच मुख्याध्यापक श्री.शरद पवार, गोरख डफाळ, विशाल सावंत,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,पालक यांनी शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववीचा विद्यार्थी  यथार्थ नाईक यांने केले. तर आभार सौ. पल्लवी रा.ओंदरे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments