रामनवमी, हनुमान जयंती व महावीर जयंती निमित्त शांतता समितीची बैठक संपन्न

 Bay team aavaj marathi 

 मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक) 

नांदगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी यांनी आगामी काळात येणाऱ्या रामनवमी, हनुमान जयंती व भगवान महावीर जयंती या धार्मिक कार्यक्रमाचे औचित्य साधून शहरात सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी शांतता समितीची बैठक आयोजित केली होती.

याप्रसंगी झालेल्या बैठकीत पोलिस निरीक्षक प्रीतम चौधरी, उपनिरीक्षक , शांतता समितीचे सदस्य, विविध धर्मीय मंडळांचे पदाधिकारी, तसेच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्व सण शांततेत आणि सर्वसमावेशक वातावरणात साजरे व्हावेत यासाठी उपस्थितांना काही महत्वाचे सूचना देण्यात आले.तसेच यावेळी मिरवणुकीचे मार्ग निश्चिती – रामनवमी व हनुमान जयंतीच्या मिरवणूका साठी संपर्क मार्ग निश्चित करण्यात आले असून, कोणत्याही वादग्रस्त ठिकाणी बदल करण्यात आला आहे. 

ध्वनी प्रदूषण होणार नाही ठरवलेल्या वेळेनंतर ध्वनी क्षेपकाचा वापर होणार नाही. याबाबत सुचना देण्यात आल्या. सर्व मंडळांनी याचे पालन करण्याचे आश्वासन दिले. ठराविक महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात येईल.सर्वधर्मीय सण एकमेकांच्या भावना लक्षात घेऊन साजरे करण्याचे आवाहन करण्यात आले.

त्याचप्रमाणे मिरवणूक दरम्यान वाहतुकीस अडथळा होणार नाही, यासाठी विशेष वाहतूक आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोणतीही अफवा न पसरवता सर्व सण आनंदाने आणि सलोख्याने साजरे करावे असे आवाहन पोलिस निरीक्षक चौधरी यांनी या केले.यावेळी बैठकीस विविध मंडळाचे पदाधिकारी सदस्य, वकील, पत्रकार, पोलीस, आजी-माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या बैठकीस उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments