शिवसेनेच्या यवतमाळ येथील आभार सभेत उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या उपस्थितीत अनेकांचा पक्षप्रवेश

 Bay- team aavaj marathi 

Dr. शिवचरण हिंगमिरे पत्रकार पत्रकार उमरखेड                           (यवतमाळ)

यवतमाळ येथे शिवसेनेच्यावतीने आयोजित आभार सभेत उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या उपस्थितीत विविध राजकीय क्षेत्रातील मान्यवर नेते व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या कार्यक्रमात या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री व राज्याचे वर्तमान उपमुख्यमंत्री पालकमंत्री एकनाथजी शिंदे यांनी उत्साही वातावरणात उपस्थित कार्यकर्त्यांच्या साक्षीने पक्ष प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत  केले.

याप्रसंगी कार्यक्रमास उद्योग मंत्री उदय सामंत, मंत्री संजय राठोड, माजी आमदार नांदेकर, पराग पिंगळे, चितांगराव कदम, ॲड. संजय जाधव शहर प्रमुख, कैलास कदम, बसवेश्वर क्षीरसागर, नितीन कलाने महिला आघाडी सपना चौधरी हे मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी उमरखेड तालुक्यातील शिवसेना उबाठा गटाचे प्रसिद्धी प्रमुख वसंत देशमुख, सुनील शहाणे, गणेशराव सूर्यवंशी, यांसह प्रतिष्ठित व्यक्तींनी शिवसेनेत प्रवेश केला. विशेषतः सुनील शहाणे आणि गणेशराव चंद्रवंशी भाजपा किसान मोर्चामध्ये सक्रिय कार्यकर्ते होते. त्यांनी शिवसेनेत प्रवेश करत, पक्षाच्या ग्रामीण व कृषी धोरणांना बळकटी देण्याची तयारी दर्शवली. पक्षप्रवेश करते वेळी वसंत देशमुख बोलताना म्हणाले की, शिवसेनेच्या कार्यपद्धतीत सामान्य जनतेसाठी काम करण्याची खरी तळमळ आहे. उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे नेतृत्व प्रेरणादायी असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळणे हे आमचे भाग्य असल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments