६१ वर्षाची परंपरा असलेल्या जपानुष्टान सोहळ्याची जगतगुरु श्री शांतिगिरीजी महाराजांच्या अमृतवाणीने सांगता

 Bay -team aavaj marathi 

श्री क्षेत्र पिनाकेश्वर महादेवाचे डोंगरावर दि ३० गुढी पाडव्यापासुन सालाबादप्रमाणे यंदाही ६१ वर्षाची परंपरा असलेल्या जपानुष्टान सोहळ्याची जगतगुरु श्री शांतिगिरीजी महाराजांच्या अमृतवाणी ने  व महाप्रसादाचे वितरण करून सांगता झाली.

या बाबत सविस्तर वृत्त असे की,नांदगाव तालुक्यातील जातेगाव पासून उत्तरेस चंदनपुरी शिवारात सह्याद्री पर्वत रांगेच्या शिखरावर असलेल्या श्री पिनाकेश्वर देवस्थानाच्या प्रांगणात निष्काम कर्मयोगी संत श्री जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांनी सन १९६४ मध्ये सुरू केलेल्या जपानुष्टान सोहळ्याच्या ६१ वे वर्ष होते. बाबाजींनी सुरुवात केलेल्या जपानुष्टान सोहळ्याची ज्योत त्यांचे उत्तराधिकारी जगतगुरु श्री शांतिगिरीजी महाराजांनी अखंड तेवत ठेवत गुढीपाडव्यापासून सुरुवात केली होती.

या कार्यक्रमास नाशिक छत्रपती संभाजी नगर, अहिल्या नगर, जळगाव धुळे जिल्ह्यातील शेकडो भाविकांच्या उपस्थितीत अखंड नंदादीप तेवत ठेवण्यात आला होता. तसेच मंदिराच्या सभामंडपात कार्यक्रमाचे सुरुवातीपासून सांगते पर्यंत एक कुंडात्मक यज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सांगता जगद्गुरु शांतिगिरी जी महाराजांचे प्रवचनाणे आणि महाआरती तसेच भगवान पिनाकेश्वर महादेवाचे व संत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज यांच्या आणि जगद्गुरु शांतिगिरी जी महाराजांचे जयजयकार करुन करण्यात आली. याप्रसंगी उपस्थित भाविक व अनुष्ठानार्थींकडून धर्म जागृती करणे, व्यसन मुक्ती, नियमित पुजा आराधना करणे यासह विविध संकल्प करून घेतले.

सर्व धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडल्यानंतर जगद्गुरु शांतिगिरीजी महाराजांचे आदेशाने अनुष्ठानार्थी भाविकांनी जातेगाव गावास ओम जनार्दनाय नमः ओम शांतिगीरी नमः ओम नमः शिवाय चा मंत्र घोषात ग्रामप्रदक्षणा घालून गावातील महादेवाचे दर्शन घेऊन आपल्या घराकडे रवाना झाले.

वरील सोहळ्यास संत महंत आणि मान्यवरांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमास व्यवस्था नांदगाव तालुका आणि पंचक्रोशीतील जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने करण्यात आली होती. 

Post a Comment

0 Comments