Bay- team aavaj marathi
Dr .शिवचरण हिंगमिरे पत्रकार उमरखेड (यवतमाळ)
आगामी काळात येणाऱ्या सन उत्सव शांततेत साजरे व्हावेत यासाठी रामनवमी च्या पूर्वसंध्येला उमरखेड पोलीस ठाण्या च्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ च्या पथकाने धडक कारवाई करून दोन संशयित आरोपी कडून देशी बनावटीचा एक गावठी कट्टा व दोन धारधार लोखंडी तलवारी जप्त करून त्यांना ताब्यात घेतले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड रामनवमी सह इतर सर्व सण शांततेत आणि उत्सवात साजरे व्हावेत कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे, अवैध शस्त्र,अग्नी शस्त्रांमुळे गुन्हे घडू नये. या उद्देशाने यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक(भा.पो.से) कुमार चिंता यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी व पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांची बैठक घेऊन केलेल्या मार्गदर्शन केले होते.
त्या अनुषंगाने दि.५ एप्रिल रोजी उमरखेड पोलीस ठाण्याचे पो. नि. शंकर पांचाळ आणि स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ चे सतीश चवरे यांनी संयुक्त दोन वेगवेगळी पथके तयार करुन तपास चक्र फिरवून मिळालेल्या गोपनीय माहीतीच्या आधारे विजय गणेश भिमेवाड रा.शिवाजी वार्ड उमरखेड यास चुरमुरा डॅम परिसरातून शिताफिने ताब्यात घेतले त्याची झडती घेतली असता, त्याच्या कमरेला एक गावठी बनावटीचा देशी कट्टा (पिस्टल) व मॅगजीन ६ राऊंड सह जप्त करुन ताब्यात घेतले.तर दुसऱ्या कारवाईत शोएब ऊर्फ शेख इब्राहीम शेख रहीम रा. अहेबाब कॉलनी उमरखेड यांचे घरी जावून त्याच्या घराची पंचा समक्ष झडती घेवून दोन लोखंडी धारधार तलवारी मिळून आल्याने त्या जप्त करुन ताब्यात घेतल्या.
या कारवाईत यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता (भा.पो.से) अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ सहा.पोलीस निरीक्षक गजानन गजभारे, सहा.पो. निरीक्षक पांडुरंग शिंदे, पो.उप.नि शरद लोहकरे,पो.उप निरीक्षक सागर इंगळे तसेच संतोष भोरगे, तेजाब रणखांब, सुभाष जाधव, रमेश राठोड, कुणाल मुंडोकार, सुनिल पंडागळे, राजेश जाधव, दिनेश चव्हाण, गिरीष बेंद्रे, संघशील टेंभरे, निवृत्त महाळनर, प्रफुल घुसे या पोलिस पथकाने सापळा रचून यशस्वी कारवाई केली.
0 Comments