शहरातील उघड्यावरील मांस विक्री बंद न केल्यास आंदोलनाचा इशारा

 Bay- team aavaj marathi 

विजय जी चोपडा जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)

नांदगाव नगरपरिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी शशिकांत जाधव व पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी यांना सकल जैन समाजातर्फे अनेक दिवसांपासून सर्रासपणे उघड्यावर मांस मच्छी विक्री सुरू असून यामुळे शहरात अस्वच्छतेचे आणि किळसवाणे वातावरण निर्माण झाले आहे. तरी श्री रामनवमी ते भगवान महावीर जयंती या दरम्यान वरील प्रकार थांबविण्यात यावा यासाठी निवेदन देण्यात आले.

या निवेदनात वरील प्रकारामुळे नांदगाव शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उघड्यावर मांस मच्छी विक्री करण्यास बंदी घालण्यात आलेली असताना देखील सर्रासपणे वरील प्रकारे होत असल्याने ही बाब गंभीर असल्याचे म्हटले आहे.

तसेच श्री रामनवमी ते भगवान महावीर जयंती पर्यंत वरील प्रकार थांबविण्यात यावा, तसेच भगवान महावीर जयंती च्या दिवशी शहरातील सर्व कत्तलखाने बंद करण्यात यावे. अशी मागणी नांदगाव नगरपरिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी शशिकांत जाधव व पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी यांना सकल जैन समाजातर्फे सोमवार दि ७ रोजी देण्यात आले आहे. या निवेदनावर सर्व जैन समाज बांधवांच्या सह्या आहेत.
  

Post a Comment

0 Comments