Bay- team aavaj marathi
भरत पारख पत्रकार नांदगाव (नाशिक)
नांदगांव तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना करीता चालु रब्बी हंगाम सन २०२४/२५ साठी नांदगांव आ.श्री.सुहास अण्णा कांदे यांनी शेतकरी बांधवांचा हिताचा विचार करून शासनाकडे विशेष प्रयत्न व पाठपुराव्याने तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी धान्य हमी भाव केंद्र सुरु करण्यास मंजुरी मिळवली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,आ.श्री.सुहास अण्णा कांदे यांच्या प्रयत्न व पाठपुराव्याने तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या निर्णय घेवून धान्य हमी भाव केंद्र सुरु करण्या- साठी मागणी केली होती. त्यांच्या मागणीनुसार दि.महाराष्ट्र स्टेट को - ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लि.यांचे कडून मंजुरी मिळाली असल्याचे कार्यालय प्रतिनिधी कळले आहे.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार नांदगांव येथील श्री शनैश्वर नांदगांव तालुका सह. खरेदी विक्री संघ लि. यांचे मार्फत किमान आधारभूत खरेदी योजने अंतर्गत महाराष्ट्र को-ऑप मार्केटिंग फेडरेशनच्या सुचना आल्यानंतर खरेदी केंद्र सुरु होणार आहे. त्या अनुषंगाने खरेदी विक्री संघाचे वतीने मका, बाजरी, ज्वारी विक्रीसाठी नोंदणी सुरु झालेली असून नोंदणीची अंतिम मुदत ही ५ सप्टेंबर पर्यंत असणार आहे.
किमान आधारभूत किंमतीचे दराने FAQ दर्जाचा शेतमाल खरेदी केला जाणार आहे त्यासाठी मका २२२५ रुपये, बाजरी २६२५ रुपये,संकरीत ज्वारी ३३७१ रुपये, आणि ज्वारी माल दांडी ३४२१ रुपये प्रती क्विंटल दर रूपये ठरविण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे. तरी ज्या शेतकरी बांधवांना आपले धान्य खरेदी विक्री संघात विक्री करावयाचे असेल त्यांनी 9420 230777 या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
0 Comments