कवी बल्लाळेश्वर तेला यांचे सुयश महाराष्ट्राचे नाव कोरले अंतर्राष्ट्रीय पातळीवर

 Bay- team aavaj marathi 

Dr. शिवचरण हिंगमिरे पत्रकार उमरखेड (यवतमाळ)

उमरखेड येथील कवी बल्लाळेश्वर दीपक तेला यांनी इंग्रजी भाषेतील आंतरराष्ट्रीय कविता उत्सवाचे मार्च महिन्यात ऑनलाईन स्पर्धेमध्ये भाग घेवून २१ वा क्रमांक पटकावला.कवी तेला हे यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील रहिवासी आहे. त्यांना दि.२१ मार्च रोजी जागतिक कविता दिवसाचे औचित्य साधून प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.

सविस्तर वृत्त असे की, नवी दिल्ली येथील ब्लू स्टार प्रकाशन, द्वारे आयोजित 'ग्लोबल पोएट्री फेस्टिवल' यांनी इंग्रजी भाषेतील आंतरराष्ट्रीय कविता उत्सवाचे मार्च महिन्यात ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत देश/विदेशातील कवींच्या १ हजारहुन अधिक कवितांचा समावेश घेतला होता. यामध्ये बल्लाळेश्वर तेला यांनी आपली कविता 'बुद्धा विल बी रिबॉर्न' हि कविता सादर केली. 

यापूर्वी कवी तेला यांनी 'एस 7 पोएट्री 'भारत' द्वारे उत्तर प्रदेशात आयोजित फेब्रुवारी महिन्यात 'राष्ट्रीय कविता स्पर्धेमध्ये १२१ वा क्रमांक मिळवुन संपुर्ण भारतात प्रथम २०० इंग्रजी कवींच्या श्रेणीत आपले नाव निश्चित केले होते. बल्लाळेश्वर तेला यांनी आपल्या यशाचे श्रेय आई ज्योती दीपक तेला आणि वडील दीपक लक्ष्मीनारायण तेला यांना दिले आहे.त्यांच्या या यशाबद्दल यवतमाळ जिल्ह्यात आणि उमरखेड शहरात शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

कवी तेला हे अमेरिकन कवी 'रॉबर्टफ्रॉस्ट' यांना आपले आदर्श मानतात आणि भविष्यात साहित्य विश्वात त्यांच्या सारखे योगदान करण्याचा त्यांचा मानस आहे. प्रत्येकांनी मोठ्या व्यक्तींना आदर्श समोर ठेवून आपले काम केले पाहिजे असे मत त्यांनी यावेळी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना  व्यक्त केले.



Post a Comment

0 Comments