कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये 'महावीर जयंती' उत्साहात साजरी...

 Bay- team aavaj marathi 

विजय जी चोपडा जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)

नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये दि 9 एप्रिल रोजी भगवान महावीर यांची जयंती मोठ्या उत्साहात व श्रद्धेने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य श्री मनी चावला यांच्या उपस्थितीत भगवान महावीरांच्या प्रतिमा पूजनाने, स्तुतीने करण्यात आली.

या निमित्ताने शाळेत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी भगवान महावीर यांच्या जीवनावरील माहिती सादर केली. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी सकल जैन बांधवांसोबत जैन धर्मशाळा या ठिकाणी " नवकार महामंत्राचा " जप केला. याप्रसंगी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अहिंसा,सत्य आणि करुणा या मूल्यांबद्दल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी रंगमंच आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये ही सक्रिय सहभाग घेतला, ज्यामुळे वातावरण उत्साहाने भरले होते. 

या कार्यक्रमास शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे चेअरमन मा. श्री सुनिल कुमार जी कासलीवाल तसेच सेक्रेटरी विजय चोपडा, प्रमिला ताई कासलीवाल, सुशील कासलीवाल , रिखबचंद कासलीवाल ,जुगलकिशोर अग्रवाल, महेंद्र भाऊ चांदिवाल, प्रिन्सिपॉल मणी चावला, मुख्याध्यापक शरद पवार, विशाल सावंत,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी महावीर जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments