या गावात पंचावन्न वर्षांपासून होते हनुमान जन्मोत्सव निमित्त सुंदरकांड पारायण

 Bay- team aavaj marathi 

Dr.शिवचरन हिंगमिरे पत्रकार उमरखेड (यवतमाळ)

उमरखेड (यवतमाळ) येथे मागील हनुमान जन्मोत्सव निमित्त सुंदरकांड या ग्रंथाचे पारायण आणि देशातील ख्यातनाम भजनी मंडळांचा भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

उमरखेड येथील प्रसिद्ध उद्योजक तथा सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या नारायण दास हरिदास भट्टड व त्यांच्या कुटुंबातर्फे मागील ५५ वर्षापासून हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात येतो.

सुंदरकांड ग्रंथाचे पारायण व भजन संध्या कार्यक्रमामध्ये येथील व परिसरातील नागरिक दरवर्षी भक्ती सागरात बुडून जातात. दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन भट्टड परिवाराच्या वतीने करण्यात येते. ही परंपरा मागील चार पिढ्यांपासून अखंड सुरू असून यंदाच्या कार्यक्रमाचे आयोजन त्यांच्या परिवारातील पाचव्या पिढीने केले आहे.भारतातील ख्यातनाम भजन सम्राट गायक व त्यांच्या संच तर्फे सुंदरकांड पारायण व भजन संध्या या कार्यक्रमाद्वारे उमरखेड कर दरवर्षी भक्ति सागरात बुडून जातात.

स्व.श्री बिहारी लालजी भट्टड उर्फ रोकड्याजी हे सूर्यनारायण व हनुमानाचे परम भक्त होते. आपल्या बालपणापासून ते दर शनिवारी सुंदरकांड स्वतः करत होते. मागील ५५ वर्षापूर्वी त्यांनी हनुमान जन्मोत्सवाला सामूहिक सुंदरकांड ग्रंथ पारायण प्रारंभ केले. 

यावर्षी भारतातील सुप्रसिद्ध भजन सम्राट श्री पैलेश जोशी व पुष्कर शर्मा व त्यांचा संगीतमय संच आपली सेवा देणार आहे. सर्व भाविकांनी शनिवार दि.१२ रोजी संध्याकाळी साडेसहा ते दहा पर्यंत या सत्संगाचा लाभ भट्टड निवास नाथ नगर रोड उमरखेड येथे करण्यात आले आहे. त्यांची पाचवी पिढी त्याच भक्तीने दरवर्षी हनुमान जन्मोत्सवाचे निमित्त सुंदरकांड ग्रंथ पाठ व भजन संध्याचे आयोजन करत आहे. या सत्संगास तमाम भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन त्यांच्या वतीने करण्यात आले आहे

Post a Comment

0 Comments