उमा महेश्वर संस्थानाच्या सभागृहात नुकत्याच पार पडलेल्या अखंड शिवनाम सप्ताहात सामाजिक विचारांची प्रबोधनाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम उमरखेड तालुक्यातील विडूळ येथे आयोजित करण्यात आला होता. मागील मागील चार वर्षांपासून ह्या व्याख्यानाचे आयोजन समितीतर्फे करण्यात येते. दिग्गज महिलांच्या व्याख्यानांनी गाजला.
धार्मिक कार्याबरोबर कौटुंबिक व सामाजिक जाणीवा बळकट होण्याच्या दृष्टीने हे अनोखे पाऊल मानले जात आहे. दि. ३ एप्रिल ते १० एप्रिल पर्यंत झालेल्या ह्या सोहळ्यात विरशैव परंपरेतील अनेक गुरुवर्यांचे आशिर्वचन झाले.
ह्या धार्मिक संस्काराबरोबर आधुनिक काळातील ज्वलंत प्रश्नांची उकल करण्याच्या हेतुने दररोज एक तास प्रबोधनाचे आयोजन करण्यात आले होते.एकुण सहा दिवस चाललेल्या ह्या वैचारिक जागर कार्यक्रमात शिक्षण,समाज,पर्यावरण, कुटुंब,आरोग्य ,व्यसनमुक्ती, महिला सुरक्षा आदि विषयांवर मंथन करण्यात आले.त्यासाठी विविध क्षेत्रातील विचारवंत मान्यवरांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
प्रबोधन मालेत बेटी बचाव बेटी पढाव, संस्कृती संवर्धन, जिजाऊ आणि सावित्रीबाईंचा वारसा नको का? महिला व मुलींची सुरक्षितता आणि समाज घटकांची जबाबदारी, हरवत चाललेली नाती आणि आपण, कुटुंब सांभाळण्यात स्त्रीयांची भुमिका इत्यादी विषयावर व्याख्यानातून आर.डी.शिंदे,विशाल गिरी,अक्का महादेवी, यवतमाळ येथील प्रा.सीमा शेटे नवलाखे, ॲड.सौ.अस्मिताआढावे-टाकणखारे, अकोला येथील सुवर्णा नालिंदे बाकडे, प्रा.निता कमठाणे यांचे अभ्यासपूर्ण प्रबोधन झाले. सद्य परिस्थित असलेल्या सामाजिक तथा शैक्षणिक समस्यावर उकल काढणाऱ्या ह्या प्रबोधन मालेसाठी परिसरातील श्रोत्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. समितितर्फे राबवत असलेल्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
0 Comments