या महाविद्यालयात पत्रकार सन्मान सोहळ्याचे आयोजन

 Bay- team aavaj marathi 

Dr. शिवचरण हिंगमिरे पत्रकार उमरखेड (यवतमाळ)

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत असलेल्या उमरखेड येथील गोपिकाबाई सिताराम गावंडे महाविद्यालयात मंगळवार दि.२९ एप्रिल रोजी पत्रकार सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमात पत्रकार सन्मान सोहळा आणि विद्यार्थ्यांच्या "आत्मदर्पण "या विशेषांकाचे प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. गावंडे महाविद्यालयाच्या वतीने दरवर्षी बी.ए. जनसज्ञापन व वृत्तपत्र विद्या साठी प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकाचा भाग म्हणून हा विशेषांक प्रकाशित करण्यात येत असतो.

वृत्तपत्र विद्या या अभ्यासक्रमाला प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांत्यांना आपल्या लेखणीतून विषय निवडीचे स्वातंत्र्य देऊन बातमी लिखाणासाठी प्रेरित करण्यात येते. आणि सामूहिक लिखाणातून आलेल्या लेखाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात येतो. यावर्षी २९ एप्रिल मंगळवार रोजी सकाळी १० वाजता महाविद्यालयातील म्युझियम सभागृहात हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यासोबतच उमरखेड शहरातील विविध पत्रकार संघटनांचे पदाधिकारी व सदस्यांचा देखील सन्मान सोहळा या निमित्ताने सत्कार आयोजित करण्यात आला आहे. 

या कार्यक्रमासाठी नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे विभागीय संचालक प्रा. डॉ. सुभाष सोनूने, उमरखेड चे उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे, संचालक विद्यार्थी कल्याण व बहिशाल केंद्र तथा सहयोगी शिक्षण शास्त्र विद्या शाखा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक चे प्राध्यापक प्रा. डॉ. दयाराम पवार, पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ, अध्यक्ष यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संस्था तथा माजी जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती राम देवसरकर, आणि सचिव यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संस्था डॉ.या.मा.राऊत यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. 

या सन्मान सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन प्राचार्य तथा केंद्रप्रमुख डॉ. एम. बी. कदम यांच्यासह बी. ए. जनसज्ञापन व वृत्तपत्र पदवी विद्या शिक्षणक्रमास असलेल्या प्रवेशित विद्यार्थ्यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments