उमरखेड शहरातील हदगाव रोडवरील आमदार गुळाचा चहा या कॅन्टीन येथे संतोष (उर्फ आलोक) दत्ता राऊत (वय २२ वर्षे) रा.भगतसिंग वार्ड हा चहा पीत असताना त्याच्या पाठीमागून येवून आलेल्या त्याच्या मित्राने आपल्याला चहा का पाजत नाहीस? असे म्हणून वाद घालत दि.२५ एप्रील रोजी दुपारी ४:३० संतोष याच्यावर चाकू हल्ला केला.
सविस्तर वृत्त असे की, शहरातील हदगाव रोडवरील कॅन्टीन वर घडली.या चाकू हल्ल्यात संतोष (उर्फ आलोक)हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष उर्फ आलोक हा दुपारी साडेचार वाजे च्या सुमारास चहा कॅन्टीन वर चहा पीत असताना त्याच्या पाठीमागून येवून आरोपी तुषार संतोष कळसे वय २२ वर्षे राहणार लोहार गल्ली उमरखेड हा आला आणि तू मला चहा का पाजत नाहीस ? असे म्हणून वाद निर्माण केला. व त्याच्या हातातील चाकूने संतोषच्या पोटाचे डाव्या बाजूच्या वर वार करून गंभीररित्या जखमी केले व जीवे मरण्याची धमकी दिली. असा उमरखेड पोलिस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.
0 Comments