मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी केलेले कार्य प्रशंसनीय - डॉ. सुभाष सोनूने समाज हितासाठी पुढाकार घेणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करणार-देवसरकर

 Bay- team aavaj marathi 

Dr. शिवचरण हिंगमिरे पत्रकार उमरखेड (यवतमाळ) 

पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे आणि या स्तंभाला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून व वृत्तपत्र विद्या पदवी शिक्षणक्रमाच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन त्यांच्याकडून करून घेण्यात आलेले कार्य खरंच प्रशांसनिय आहे आणि भविष्यात विद्यार्थ्यांना ते नक्कीच कामी पडतील असे गौरवोद्गार अमरावती विभागीय संचालक प्रा. डॉ. सुभाष सोनूने यांनी काढले. ते गो.सि.गावंडे महाविद्यालय अभ्यास केंद्राच्या वतीने आयोजित पत्रकार सन्मान सोहळा व आत्मदर्पण विशेषांक प्रकाशन सोहळा कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून दिनांक २९ एप्रिल रोजी म्युझियम सभागृहात बोलत होते. 

यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संस्थेचे सचिव डॉ. या. मा.राऊत, उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक चे संचालक विद्यार्थी कल्याण व वैशाली केंद्र तथा सहयोगी प्राध्यापक शिक्षण शास्त्र विद्या शाखा प्रा. डॉ. दयाराम पवार, पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ, यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संस्थेचे अध्यक्ष तथा जि.प.यवतमाळ चे माजी अर्थ व बांधकाम सभापती राम देवसरकर आणि प्राचार्य तथा केंद्रप्रमुख डॉ. एम. बी. कदम उपस्थित होते. 

डॉ. सोनूने पुढे बोलताना म्हणाले की, ज्ञानगंगा घरोघरी या विद्यापीठाच्या ब्रीदवाक्य प्रमाणेच ज्ञानाची गंगा निरंतर घरोघरी पोहोचविण्याचे कार्य अभ्यास केंद्राच्या माध्यमातून सुरू आहे. दूरशिक्षण प्रणाली नुसार विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य विद्यापीठ करत आहे. पत्रकारिता शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या लेखणीतून प्रकाशित केलेला विशेषांक हा उत्तम प्रात्यक्षिकाचा नमुना असल्याचेही यावेळी ते म्हणाले. डॉ. दयाराम पवार यांनी उमरखेड सारख्या ग्रामीण भागात पत्रकारितेचे शिक्षण विद्यार्थी घेत असल्याबद्दल कौतुक केले.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यास केंद्राकडून काढण्यात येत असणारे विद्यार्थ्यांसाठी अभ्यास दौरे व प्रात्यक्षिक कार्य विद्यार्थ्यांकडून पूर्ण करून घेण्यासाठी अभ्यास केंद्र घेत असलेला पुढाकार पाहून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे विद्यार्थी कोणत्याही बाबतीत मागे राहणार नाहीत असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रस्तावना व आभार अभ्यास केंद्र संयोजक प्रा.बी.यु.लाभशेटवार यांनी केले,तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केंद्र सहाय्यक विकास माने यांच्यासह जन संज्ञापन व वृत्तपत्र पदवी विभागाचे प्रा. संतोष मुडे, प्रा.सिद्धेश्वर जगताप, प्रा. लक्ष्मीकांत नंदनवार, प्रा. व्यंकटेश पेन्शनवार यांचेसह प्रवेशित विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. 

समाज हितासाठी पुढाकार घेणाऱ्या पत्रकारांसाठी पुढील वर्षीपासून रोख रकमेसह सन्मान करणार - राम देवसरकर

पत्रकार हा नेहमीच सजग असतो त्यांच्या लेखणीने समाजाला दिशा देण्याचे कार्य घडते. समाजातील समस्या व काही चांगल्या बाबी नेहमीच समोर आणण्याचे कार्य पत्रकारांच्या माध्यमातून होत असते. यापुढे अशा पत्रकारांचा रोख रकमेसह सन्मानचिन्ह देऊन विदर्भ पातळीवर गौरव करण्याचा यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संस्थेचा मानस असून स्व. डॉ. आत्माराम गावंडे स्मृती प्रित्यर्थ हा पुरस्कार देण्यात येईल अशी घोषणा राम देवसरकर यांनी सदर कार्यक्रम प्रसंगी केली.


Post a Comment

0 Comments