नांदगाव येथील श्री.एम. जे. कासलीवाल परंपरेनुसार विशिष्ट संकल्पनेवर आधारित स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येते यावर्षी 'स्पर्श' या संकल्पनेवर आधारित कार्यक्रम विद्यालयाच्या प्रांगणात सादर करण्यात आला. या कार्यक्रमासाठी आ.श्री सुहास अण्णा कांदे तसेच श्री रामवीर सर (CBSE Regional Officer) यांना प्रमुख पाहुणे म्हणून तर जगदीश अग्निहोत्री civil Judge, या कार्यक्रमासाठी आ.श्री सुहास अण्णा कांदे तसेच श्री रामवीर सर (CBSE Regional Officer) यांना प्रमुख पाहुणे म्हणून तर जगदीश अग्निहोत्री (civil Judge) ,नगरपालिकेचेमुख्यकार्यकारी अधिकारी श्री. शामकांत जाधव,गट विकास अधिकारी श्री प्रमोद चिंचोले,पोलीस निरीक्षक श्री प्रीतम चौधरी, (LRO Nandgaon)योजना अकोलकर यांना मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी शहरातील शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, आर्थिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. श्री एम.जे.के एज्युकेशन ट्रस्टचे संस्थापक,अध्यक्ष श्री मा. सुनीलकुमार कासलीवाल तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्रमुख पाहुणे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भगवान महावीर तसेच सरस्वती प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे प्राचार्य श्री. मनी चावला यांनी केले. कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे, मान्यवरांचे स्वागत व सत्कार संस्थेचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी शाल, पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन केले.
या कार्यक्रमात मा. आमदार सुहास अण्णा कांदे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, ही शाळा आता छोटे रोपटे राहिलेले नसून त्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. याचे सर्व श्रेय या संस्थेच्या संस्थाचालकांना जाते ते एक उत्तम संस्थाचालक, कुटुंबप्रमुख अगदी शिस्तबद्ध पद्धतीने आपले सर्व कामकाज बघतात. ग्रामीण भागात शहरी सुविधा पुरवणारी एकमेव शाळा, ही शाळा राज्यात नव्हे तर भारतात आपला नावलौकिक करेल असा विश्वास व्यक्त केला.
या कार्यक्रमात भाव साक्षरता, वैज्ञानिक दृष्टिकोन, वाहन विवेक, राष्ट्रीय जबाबदारी, ध्येय निश्चिती, निसर्गाबाबतची कृतज्ञता या समाजमन घडवणाऱ्या विषयांवर मुलांनी सुंदर सादरीकरण केले. यामध्ये प्रत्येक वर्गास वेगवेगळी थीम देण्यात आली होती त्यामध्ये एज्युकेशन थीम, आई-वडिलांचे तसेच भावा बहिणीचे प्रेम, फाईव्ह एलिमेंट्स, ओल्ड टू न्यू,कृष्ण लीला,जय जवान जय किसान, द्रोपदी ॲक्ट, शिवतांडव,महिला सबलीकरण,रामायण,वीर दौडले अशा व यासारख्या वेगवेगळ्या थीम वरती विद्यार्थ्यांनी सुंदर असे सादरीकरण करून उपस्थितांची मन जिंकले.
याचबरोबर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी पारितोषिक वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थिनी श्रावणी गायकवाड, नयना जाधव, ऋग्वेदा रावओंदरे, शिक्षिका वर्षा आहेर, सुषमा काळे रिटा उबाळे, मोहिनी दिसले क्रीडा शिक्षक अशोक बागुल यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल तसेच शाळेला दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्मृती चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष श्री सुनीलकुमार कासलीवाल यांचा जीवनपट उलगडणारी एक फिल्म या कार्यक्रमात दाखवण्यात आली होती. त्यावेळी आपल्या शाळेविषयी असलेले प्रेम त्यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना केले.
या कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा होता तो म्हणजे ग्रँड फिनाले या फिनाले मध्ये शाळेतील सर्व शिक्षका तसेच विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग घेऊन उत्कृष्ट सादरीकरण करून उपस्थित सर्व रसिक, प्रेक्षकांची दाद मिळवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चांदनी पारख, पल्लवी रावओंदरे, सुषमा काळे, दत्तात्रय पवार तर विद्यार्थी यथार्थ नाईक ,चारू यादव तसेच संस्कृती बोरसे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य.चावला यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
0 Comments