किसान माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन, उत्साहात साजरा

 Bay- team aavaj marathi 

विजय जी चोपडा जेष्ठ पत्रकार नांदगाव नाशिक 

नांदगाव तालुक्यातील वाखारी येथे नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या किसान माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून यानिमित्ताने मुख्याध्यापक श्री.के.व्ही. खालकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्यांनी आपल्या मनोगतातून महाराष्ट्र दिन,कामगार दिन याबाबत माहिती दिली.


ध्वजास मानवंदना देवून मनोगत व्यक्त करताना मुख्याध्यापक के.व्ही खालकर  

तसेच १ मे १९१८ रोजी ना.शि.प्र. मंडळाची स्थापना करण्यात आली होती आज संस्थेचा १०७ वा वर्धापन दिन देखील मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संस्थेच्या संस्थापकांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. माजी शिक्षक श्री पोपट चव्हाण सर यांनी संस्थेचा १०७ वर्षाचा प्रेरणादायी शैक्षणिक वाटचालीबाबत उपस्थित पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना माहिती दिली.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ज्ञानयात्री या संस्थेच्या त्रैमासिकाचे प्रकाशन करण्यात आले आणि वर्गात प्रथम दोन क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणपत्रक देण्यात आले. याप्रसंगी पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री. भाऊसाहेब सोनवणे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. भाऊसाहेब खैरनार हे उपस्थित होते. 

 सर्व विद्यार्थ्यांना निकाल आणि ज्ञानयात्री वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती आर.डी.पाटील यांनी केले. वरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनील हिंगमीरे, प्रशांत वाघ, नंदू दवांगे, रोहिणी गोराडे, दिलीप भडांगे, ज्योत्स्ना चव्हाण, योगेश कुलकर्णी, ऋषी डोमाडे या शिक्षकांनी प्रयत्न केले.


Post a Comment

0 Comments