भाजपा कडून केंद्र सरकारच्या निर्णयाचे आतिषबाजी व ढोल ताशा च्या गजरात स्वागत

 Bay- team aavaj marathi 

मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)

 देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या केंद्र सरकारने देशात जात निहाय जनगणना करण्याच्या घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाचे नांदगाव येथे दि २ मे रोजी आतिश बाजी करत ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले.

 नांदगाव तालुका भारतीय जनता पार्टीचे नेते संजय सानप यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पदाधिकारी यांनी हुतात्मा चौकात फटाक्यांच्या आतिषबाजी करून ढोल ताशांच्या गजरात जल्लोष साजरा करत केंद्र सरकारने देशात जातीनिहाय जनगणना करण्याचा नुकताच निर्णय घेतला. मोदीजींच्या नेेेतृत्वाखालील सरकारने घेतलेल्या या निर्णय सामाजिक दृष्ट्या केंद्र सरकारचे महत्त्वाचे अत्यंत पाऊल आहे.

या निर्णयाचे नांदगाव येथील भाजपा नेते व कार्यकर्त्यांनी येथील हुतात्मा चौकात ढोल ताशांच्या गजरात आतिषबाजी करत करण्यात आले. यावेळी मा.संजय भाऊ सानप, दत्तराज छाजेड, प्रदीप थोरात,सतीश शिंदे,अभिषेक विघे,धनराज मंडलिक ॲड.उमेश सरोदे, रेखा शेलार,मनोज शर्मा, तारा शर्मा, सुरेश कुमावत, विजय बडोदे, अरुण पवार,बळवंत शिंदे, हिरालाल गांधी,अन्नपूर्णा जोशी, दिनेश जेजुरकर, शंकर वाघमोडे, भगवान सोनवणे, लकी सिंग फुलारे,पंकज जंगम, कृष्णा देहाडराय, बबन मोरे आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.याप्रसंगी जात निहाय जनगणना करण्याचा घेतलेल्या या ऐतिहासिक निर्णयाबद्दल पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी व केंद्र सरकार यांचे मनःपूर्वक आभार मानले.




Post a Comment

0 Comments