परधाडी येथे महावितरणचे उपकेंद्र सबस्टेशन बांधकामाचे भूमिपूजन संपन्न.

 Bay- team aavaj Marathi 

मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)

आ. सुहास अण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून तालुक्यातील परधाडी येथे (33/11 kv 05 mv) महावितरण उपकेंद्र मंजूर करण्यात आले. याचे भूमिपूजन माजी आ.अनिल दादा आहेर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. याप्रसंगी आमदार सुहास अण्णा कांदे व सौ.अंजुमताई कांदे उपस्थित होते.
यावेळी परधाडी ग्रामपंचायत तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने आमदार सुहास अण्णा कांदे यांचा राज्यमंत्री दर्जा मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

तर परधाडी ग्रामपंचायत महिला सरपंच व सदस्यांनी सौ अंजुमताई सुहास कांदे यांचा सत्कार केला. यावेळी बोलताना अनिल दादा आहेर यांनी आ. सुहास अण्णा कांदे यांनी आपल्या कार्याच्या जोरावर मतदार संघातील जनमानसात स्वतःची जागा निर्माण केली आहे. विधानसभा निवडणुकीत परधाडी व परिसरातील गावातील लोकांनी भरभरून मते दिल्याची परतफेड म्हणून शेतकरी बांधवांना उपयोगी ठरेल अशा या विज वितरण कंपनीचे सबस्टेशनच्या भूमिपूजन होत असल्याचे सांगितले. पुढे बोलताना परधाडी व परिसरातील गावांच्या विविध प्रलंबित समस्या आपण लवकरच सोडवाल अशी आशा व्यक्त केली

आ. सुहास अण्णा कांदे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना दादांनी माझ्यावर विश्वास ठेवून निवडणुकीत माझ्या पाठीशी राहिले हे मी शेवटपर्यंत विसरणार नाही. यापुढे आपण जो आदेश कराल त्या आदेशाचे पालन केले जाईल असा शब्द दिला. लवकरच न्यायडोंगरी येथे सौर ऊर्जा प्लांट निर्माण होऊन या पंचक्रोशीतील नागरिकांना दिवसा वीज मिळेल आणि शेतकरी बांधवांच्या हाल अपेष्टा दूर होतील असेही सांगितले.परधाडी येथे निर्माण होत असलेल्या उपकेंद्र सबस्टेशन मुळे न्यायडोगरी येथील सबस्टेशनचा मोठा लोड कमी होईल आणि त्यामुळे परधाडी व पंचक्रोशीतील गावातील शेतकरी बांधवांना सुरळीत वीज पुरवठा होणार आहे.

याप्रसंगी स्टेजवर माजी सभापती विलास भाऊ आहेर
शिवसेना तालुकाप्रमुख साईनाथ गिडगे बाजार समितीचे सभापती दर्शन आहेत किरण भाऊ कांदे संचालक अमोल शेठ नावंदर अनिल वाघ जीवन गरुड गोरख सरोदे हरेश्वर सुर्वे ठेकेदार समाधान पाटील बाळासाहेब आव्हाड माजी नगराध्यक्ष योगेश पाटील गोकुळ शेठ कोठारी पिंटू शिरसाट शिवाजी बापू ॲड. किरण गायकवाड, उदय आप्पा पवार, माया गायकवाड सुरेखा पवार सरला पवार आशाबाई साबळे शारदा बागुल, आदि सह पंचक्रोशीतील गावातील नागरिक शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पाटील सर व आभार ॲड. अमोल आहेर यांनी केले

Post a Comment

0 Comments