pinakeshwar Temple-पिनाकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्षपदी अर्जुन (बंडू) पाटील यांची एकमताने निवड

 Bay- team aavaj marathi 

नांदगाव तालुक्यातील जातेगाव पासून उत्तरेस चंदनपुरी शिवारात सह्याद्री पर्वत रांगेच्या शिखरावर असलेल्या श्री पिनाकेश्वर महादेवाच्या ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाच्या रविवार दि ४ मे रोजी झालेल्या बैठकीत अध्यक्षपदी अर्जुन (बंडू) पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.


या बाबत सविस्तर माहिती अशी की, नाशिक जिल्ह्यातील श्री क्षेत्र त्रंबकेश्वर नंतर क्रमांक दोन चे महादेवाचे देवस्थान म्हणून ओळख असलेले श्री पिनाकेश्वर महादेव देवस्थानाच्या श्री संत जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज संस्कारित श्री पिनाकेश्वर महादेव मंदिर चंदनपुरी जातेगाव या संस्थेच्या विश्वस्त मंडळाची रविवार दि ४ मे रोजी बैठक झाली. या बैठकीत आ सुहास अण्णा कांदे यांचे खंदे समर्थक नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती श्री अर्जुन (बंडू) यशवंत पाटील, उपाध्यक्ष पदी ज्ञानदेव मुरलीधर पवार, सचिव बाबासाहेब सुदामराव चव्हाण, कोषाध्यक्ष रामदास वामन चव्हाण तर सदस्य म्हणून ज्ञानेश्वर यादवराव चव्हाण, शिवाजी त्र्यंबक वर्पे शरद लालचंद पवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.



निवड झालेल्या नवीन विश्वस्त मंडळाने श्री पिनाकेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन देवळाच्या ठिकाणी आवश्यक विकास कामांबाबत चर्चा करून पाणी टंचाई असल्याने पावसाळा संपल्यानंतर भक्तनिवास स्वच्छतागृह आणि इतर आवश्यक विकास कामांना प्राधान्यक्रमाने करण्याचे मनोगत व्यक्त केले. 






Post a Comment

0 Comments