आदिवासी आश्रम शाळेत एक दिवसीय विभागीय कार्यशाळा संपन्न.

 Bay- team aavaj marathi 

Dr. शिवचरण हिंगमिरे पत्रकार उमरखेड (यवतमाळ)

 उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथे शासकिय अनुदानित आश्रम शाळेतील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विभागात अध्यापन करणाऱ्या इयत्ता ५ ते १२ वी पर्यंतच्या शिक्षकाचे एक दिवसीय विभागीय कार्यशाळा संपन्न झाली. 
 या कार्यक्रमाचे अध्यक्ष व मार्गदर्शक म्हणून अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग अमरावतीचे जितेंद्र चौधरी तर प्रमुख पाहुणे  पुसद येथील प्रकल्प अधिकारी अमोल मेतकर, माजी आ. उत्तमराव जी इंगळे,अध्यक्ष श्रीमती लक्ष्मीबाई राघोजी इंगळे शिक्षण प्रसारक मंडळ मोरचंडी तथा अध्यक्ष आदिवासी मोर्चा महाराष्ट्र राज्य), श्रीमती ज्योती ताई उत्तमरावजी इंगळे (सचिव श्रीमती लक्ष्मीबाई राघोजी इंगळे शिक्षण प्रसारक मंडळ मोरचंडी).रमाकांत इंगळे, डॉ. धनंजय गायकवाड, शामसुंदर मक्रमपूरे, राजेश सुर्वे,एस. आर. शेख, सहाय्यक प्रकल्प अधिकारी, अमरावती, जवाहर गाढवे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी धारणी,आणि ए.व्ही.चव्हाण, सहाय्यक प्रकल्प अधिकारी पुसद, मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांनी क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले.

याप्रसंगी अमोल मेतकर प्रकल्प अधिकारी पुसद, माजी आमदार  उत्तमराव जी इंगळे, जितेंद्र चौधरी अप्पर आयुक्त अमरावती यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

उद्बोधन सत्रात डॉ.धनंजय गायकवाड, शामसुंदर मक्रमपूरे, स्वागत समारंभ संचालन पी.एस.तामगाडगे, उद्बोधन व मार्गदर्शन सत्राचे संचालन जवाहर गाढवे यांनी केले. एक दिवसीय विभागीय कार्यशाळा आदिवासी आश्रम शाळा ढाणकी येथे कार्यक्रमाचे अतिशय सुदंर नियोजन केल्याबद्दल जितेंद्र चौधरी अप्पर आयुक्त अमरावती यांनी संस्था अध्यक्ष माजी आमदार उत्तमराव  इंगळे यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

Post a Comment

0 Comments