Bay- team aavaj marathi
भरत पारख पत्रकार नांदगाव (नाशिक)
आ.कांदेच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नांदगाव तालुक्यात शिवसेनेत इनकमिंग सुरूच आहे, तालुक्यातील विविध राजकीय पक्षांच्या नेते व कार्यकर्ते आठवड्याचा खंड न पडता शिवसेना पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत.
तालुक्यातील पिंपरी हवेली येथील सोसायटीचे माजी चेअरमन शिवाजी दामू वाघ बाळासाहेब वाघ पिंटू गांगुर्डे संजय मोरे तसेच प्रतिष्ठित व्यापारी योगेश वाघ यांनी आ. सुहास अण्णा कांदे यांच्या उपस्थितीत पिंपरी हवेली येथे झालेल्या कार्यक्रमात शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.यावेळी बोलताना योगेश वाघ यांनी आम्ही पक्षात नव्हतो तेव्हाही आमच्या मनात अण्णाच होते. याला एकमेव कारण म्हणजे अण्णांचा विकास कामांची गती पाहून आम्ही सर्वांनी अधिकृत शिवसेना पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
आ. सुहास अण्णा कांदे यांनी यावेळी बोलताना पक्षात प्रवेश करणाऱ्या सर्व शिवसैनिकांचे स्वागत केले तसेच आपणास योग्य तो मानपान सन्मान दिला जाईल आपल्या सूचनांचे पालन केले जाईल. तसेच आपल्या प्रत्येक अडचणींमध्ये खंबीरपणे पाठीशी उभा राहील असा विश्वास दिला. कार्यक्रमाला उशीर झाल्या नंतरही मोठ्या संख्येने नागरिक कार्यक्रमास उपस्थित असल्याचा आनंद व्यक्त करून दाखवला. यावेळी परधाडी येथील पहिली विधी तज्ञ ठरलेली कु. नयना बाळासाहेब वाघ हिचा पुष्पगुच्छ व शाल देत सौ. अंजुम ताई सुहास कांदे यांनी सत्कार केला.
यावेळी राज्यमंत्री दर्जा मिळाल्याबद्दल ग्रामस्थ व पक्ष प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी आमदार सुहास अण्णा यांचा सत्कार केला.या प्रसंगी सौ.अंजुमताई कांदे विलास भाऊ आहेर अनिल वाघ साईनाथ भाऊ गिडगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी रेखा शिवाजी वाघ, सोनाली योगेश वाघ, लक्ष्मीबाई बाळासाहेब वाघ,कमलाबाई परदेशी, माया नाना कदम आदी सह विकास सोसायटी चे माजी चेअरमन दिनकर आनंदा पाटील, सुदाम बापुराव वाघ, सुदाम वाघ, नामदेव पाटील, राकेश सिंग परदेशी, बापुशेठ कासार, दादासाहेब वाघ, छगन वाघ, प्रविण पाटील, नानासाहेब पटाईत, सुनिल वाघ, योगेश सोनवणे, विजय पाटील, समाधान वाघ, विलास मोरे, गोरख शेळके, छोटुसिंग गायकवाड , शरद चव्हाण, रमेश मोरे, बाबुलाल सोनवणे, गोरख राठोड, मोहन चव्हाण, रामलाल राठोड, अंबादास शेजवळ,रतन चव्हाण विशाल राठोड हे उपस्थित होते.
0 Comments