उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी /मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या 12 वी परीक्षेचा निकाल घोषित झाला असून लोकनेते कै अँड विजय शिवराम आहेर हायस्कूल व जुनिअर कॉलेज न्यायडोंगरी विद्यालयाचा निकाल 90.58 लागला. विद्यालयाचे एकूण 170 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते पैकी 05 विद्यार्थी विशेष योग्यतेसह तर 35 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले विद्यालयाचे एकूण 154 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात कनिष्ठ महाविद्यालयातील क्रमांक 1 अशोक लक्ष्मण चव्हाण 76.73 % क्रमांक 2 अक्सा नजीम तांबोळी 73.33 %, क्रमांक 3 हर्षला विनोद साबळे 72.50 %, 4 जेजुरकर आकांक्षा बापूसाहेब 70.33 % आणि क्रमांक 5 जानराव आशा जितेंद्र 70.17% मिळवून प्रथम पाच यशाचे मानकरी ठरले आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सरचिटणीस विलासराव आहेर यांनी अभिनंदन केले आहे. विद्यालयाच्या प्राचार्या पल्लवी आहेर, उपमुख्याध्यापक रत्नमाला सोनगीरे, पर्यवेक्षक तानाजी मवाळ व संस्थेचे संचालक तथा मुख्य लिपिक बाळासाहेब भोसले यांनी अभिनंदन केले आहे तसेच विद्यालयाच्या सर्व शिक्षकवृंद शिक्षकेत्तर कर्मचारी व सेवक वर्गाने अभिनंदन करुन पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहे.
0 Comments