आ. कांदे यांनी उपलब्ध जलसाठ्यातील क्षमता वाढविणे व तालुका टँकर मुक्त करणे बाबत घेतली आढावा बैठक

 Bay- team aavaj marathi 

मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक) 

आ. सुहास अण्णा कांदे यांनी तालुक्यातील उपलब्ध जलसाठे, त्यातील पाण्याचे नियोजन व शेती सिंचनाच्या दृष्टीने भविष्यात वाढ करणे बाबत नांदगाव येथील शिवनेरी या शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात आढावा बैठक आयोजित केली होती. त्यात तालुक्यात दोनशे च्या वर पाझर तलाव बंधारे लहान मोठे धरणे असून त्यातील गाळ काढणे, तसेच आहे त्या तलावांची साठवण क्षमता वाढविण्यासाठी तातडीने प्रस्ताव तयार करणे, तसेच तालुक्याला टँकरमुक्त करण्याच्या दिशेने प्रयत्न करावे असे आवाहन आ.सुहास अण्णा यांनी केले.

यावेळी जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे माजी आ.संजय पवार यांच्यासह तालुक्यातील पाणी प्रश्नाची जाण असणाऱ्या पदाधिकारी व विविध शासकीय खातेप्रमुख यांच्या संयुक्त बैठकीस उपस्थित होते.

तसेच तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची समस्या मार्गी लागली असली तरी शेतकरी बांधवांना शेतामध्ये सिंचनासाठी पाणी मिळावे यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करून नियोजन करावे. उपलब्ध जलसाठे त्यातील क्षमतेचा सांगोपांग आढावा घेतला. नवीन जलसंधारणाची कामे वाढविण्याबाबत चर्चा केली. त्याचप्रमाणे सिंचन क्षेत्रात वाढविण्यासाठी  कृती आराखडा निश्चित करावा. त्यासाठी गरज पडल्यास देवाज फाउंडेशनच्या माध्यमातून आर्थिक मदत देण्याचा इरादा आ. कांदे यांनी बोलून याप्रसंगी बोलुन दाखविला. 

जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांनी माणिक पुंज धरणाच्या मागील क्षेत्रात नव्या प्रकल्पाची आवश्यक असल्याचे व्यक्त मत व्यक्त करताना यंत्रणेने अधिक सकारात्मक बघण्याची आवश्यकता व्यक्त केली. तर समाधान पाटील यांनी पांझण मन्याड शाकांबरी लेंडी व अन्य लहान नद्यांचे संलग्नीकरण असलेला तालुका अंतर्गत नदीजोड प्रकल्प हाती घेण्याची मागणी केली. 

या बैठकीसाठी तहसीलदार सुनील सैंदाने गटविकास अधिकारी पाठक, तालुका कृषी अधिकारी रवींद्र डमाळे, वनपरिक्षेत्र अधिकारी हेमंत कोकाटे, उपविभागीय जलसंधारण अधिकारी उपविभाग मालेगाव अंकिता वाघमारे, तसेच उपविभागीय जलसंधारण अधिकारी मृदू व जलसंधारण उपविभाग मालेगाव उप अभियंता माणिकपुंज प्रकल्प नागासाक्या प्रकल्प गिरणधरण प्रकल्प सहाय्यक  अधिकारी, रोजगार हमी योजनेचे अधिकारी तसेच बाजार समिती संचालक एकनाथ सदगीर,अमोल नावंदर, सतीश बोरसे ,किशोर लहाने, समाधान पाटील, प्रमोद भाबड, सागर हिरे,प्रकाश शिंदे, शरद सोनवणे,नितीन आहेर,ॲड.अमोल आहेर, भैय्यासाहेब पगार आदी उपस्थित होते


Post a Comment

0 Comments