नियमित पाणीपुरवठा न झाल्यास प्रहार संघटनेचा आंदोलनाचा इशारा.... वर्षभरात होतो फक्त विस वेळा पाणी पुरवठा

Bay- team aavaj marathi 

Dr. शिवचरण हिंगमिरे पत्रकार उमरखेड (यवतमाळ)   

उमरखेड तालुक्यातील ढाणकी शहरात प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे पाणीटंचाईने उग्र स्वरूप धारण केले असून नळपाणी पुरवठा योजनेअंतर्गत महिन्यातून केवळ एक वेळा पाणी पुरवठा करण्यात येत असल्याने शहरात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असल्याने युवा प्रहार जनशक्ती पक्षाचे यवतमाळ जिल्हा उपप्रमुख अभिजीत गंधेवार यांनी ढाणकी नगरपंचायत चे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश चौधरी यांना शुक्रवार दि ९ में रोजी निवेदनात नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. 


मुख्य कार्यकारी गणेश चौधरी यांना दिलेल्या निवेदन देताना
 युवा प्रहार जनशक्ती पक्षाचे यवतमाळ जिल्हा उपप्रमुख अभिजीत गंधेवार भास्कर गंजेवाड, श्रावण चांदले, मनोज पोंगाणे, रोहित बेंडके, कृष्णा कदम, रघुनाथ खंदारे 

उमरखेड शहरानंतर तालुक्यातील सर्वात मोठी ४० हजाराच्या जवळपास लोकसंख्या असलेल्या व नगरपंचायत असलेल्या ढाणकी शहरात पाणीटंचाई मागील २५ वर्षापासून पाचवीला पुजलेली आहे. सद्यःस्थितीत महिनाभरातून एकवेळा नागरिकांना पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांना ५०० लिटर पाण्याची टाकी घेण्यासाठी १३० रुपये मोजावे लागत असून चार जणांच्या कुटुंबांना महिन्याकाठी पाण्यासाठी एक हजार रुपये खर्च करावा लागत आहे. पाण्याची उपलब्धता असताना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीला पाणी भरपूर आहे. परंतु विहिरीचा गाळ न काढल्याने विहिरीत मध्ये (विज पंप) अडकून असून, विहिरीवरून आलेल्या पाइपलाइन मध्ये गाळ अडकून बसल्याने ठिकठिकाणी पाणी पुरवठा योजनांची मुख्य पाईप लाईन फुटल्याचे समजते. अशा या भोंगळ कारभार आणि प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे ढाणकी तील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. ढाणकी शहरात उन्हाळ्यातील चार महिने महिन्यात एकदा तर इतर आठ महिने महिन्यातून दोन वेळा असे नळाला पाणी येते. सारासार विचार केला तर नळ पाणीपुरवठा योजनेअंतर्गत वर्षातून २० वेळा नळपाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात आहे.

येथे पाच वर्षांपूर्वी लोकसंखेच्या आधारे नगरपंचायत करण्यात आल्याने स्थानिकांना चांगल्या मुलभूत सुविधा उपलब्ध होतील अशी आशा व्यक्त केली जात होती. मात्र प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. सन १९९५ मध्ये पैनगंगा नदीपात्रातून गांजेगाव येथून ढाणकी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी जलवाहिनी टाकण्यात आली. या व्यतिरिक्त सन २००० ला फिल्टर बसवण्यात आले. परंतु नगरपंचायती कडे पाटबंधारे विभागाची थकबाकी असल्याने हे  पाणी आरक्षित केले नसल्याचे कळते. त्यामुळे मागील सहा वर्षांपासून गांजेगाव येथील नदीच्या बंधाऱ्यातून तात्पुरता महिन्यांतून एकदा पाणी पुरवठा आहे. त्यामुळे पाणी उपलब्ध असताना शहरात कृत्रिम पाणी टंचाई झाल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

नागरिकांना तात्काळ दोन दिवसात सुरळीत आणि योग्य प्रमाणात पाणी पुरवठा करण्यात यावा अन्यथा नगरपंचायत कार्यालय ढाणकी या ठिकाणी प्रहार जनशक्ती पक्ष युवा यवतमाळ जिल्ह्याच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा युवा प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अभिजीत गंदेवार यांनी मुख्य कार्यकारी गणेश चौधरी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी भास्कर गंजेवाड, श्रावण चांदले, मनोज पोंगाणे, रोहित बेंडके, कृष्णा कदम, रघुनाथ खंदारे, आदि युवा प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments