नांदगाव येथील भुजबळांचे कट्टर समर्थक माजी नगरसेवक वाल्मीक भाऊ टिळेकर यांनी शहरातील प्रभाग एक मधील कार्यकर्त्यांसह आ.सुहास अण्णा कांदे व सौ अंजुमताई कांदे यांच्या उपस्थितीत रविवार दि २९ रोजी शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी आ. सुहास अण्णा यांनी टिळेकर यांच्यासह पक्षप्रवेश करणार्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले.
यावेळी बोलताना वाल्मीक टिळेकर यांनी मागील दहा वर्ष मा.आमदारांच्या सोबत काम केले पण अपेक्षित विकास कामे झाले नाहीत.अखेर सर्वोतोपरी विचार करून आ. सुहास अण्णा कांदे यांची विकास कामे करण्याची कार्यपद्धती बाबत कार्यकर्त्यांचे मनोगत जाणून घेवून, सर्व समर्थकांसह आम्ही शिवसेना पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, यापुढे आम्ही यापुढे अण्णांसोबत काम काम करण्याचा निर्णय घेतला या पुढे अण्णा साहेबांच्या सोबत असणार असे मत व्यक्त केले.
याप्रसंगी वाल्मिक टिळेकर यांना नांदगाव तालुका संघटक पदाची जबाबदारी देण्यात आली.सोबतच गणेश पंडित सोमासे यांची युवा सेना विभाग प्रमुखपदी, शरद महाजन यांची युवा सेनेच्या नांदगाव शहर उपाध्यक्षपदी, सतीश परशुराम महाजन यांची युवा सेनेच्या शहर सहसंघटक पदी, तर डॉ. वाल्मीक भास्कर महाजन यांची शिवसेना नांदगाव शहर संघटक पदी नियुक्ती करण्यात आली.
याप्रसंगी शिवसेना शहर प्रमुख सुनील जाधव यांनी सूत्रसंचालन केले तर अमोल शेठ नावंदर यांनी सर्व प्रवेश करणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे शिवसेना पक्ष स्वागत केले.
0 Comments