समृद्धी सहकारी बँकेचे श्री व सौ कांदे यांच्या हस्ते उद्घाटन उत्साहात

 Bay- team aavaj marathi 

नांदगाव येथे समृद्धी सहकारी बँकेचे रविवार दि. २९ रोजी आ.सुहास अण्णा कांदे व बॅंकेच्या अध्यक्षा सौ.अंजुमताई कांदे यांच्या शुभहस्ते उद्घाटन उत्साहात संपन्न झाले.याप्रसंगी नांदगाव मतदार संघातील प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, शिवसेना नेते, पदाधिकारी, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यावेळी मनोगत व्यक्त करताना आ. सुहास आण्णा कांदे यांनी या बँकेच्या माध्यमातून माझ्या मायबाप जनतेला लहान मोठा व्यवसाय करणाऱ्या व्यवसायीक शेतकरी बांधव यांना निश्चितच फायदा होईल. प्रामाणिक हेतूने आम्ही बँक सुरू करत आहोत असे प्रतिपादन केले. तसेच बँकेच्या शुभारंभ आधीच 20 कोटी रुपयांच्या ठेवी जमा झाल्या असून मतदार संघातील जनतेने दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे मत व्यक्त करताना आभार व्यक्त केले. 

तर बॅंकेच्या अध्यक्षा सौ.अंजुमताई कांदे यांनी यावेळी खातेदार आणि बँक यामध्ये कधीही दुरावा निर्माण होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ असा विश्वास व्यक्त करताना उपस्थितांना खात्री दिली. याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले नेतेमंडळी व्यावसायीक, शेतकरी बांधव तसेच महिला वर्गांनी सर्व संचालक मंडळाचे अभिनंदन केले.






Post a Comment

0 Comments