Bay -team aavaj marathi
विजय जी चोपडा जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)
नांदगाव येथील जे.टी.कासलीवाल इंग्लिश मिडियम स्कूलच्या प्रांगणामध्ये शालेय मंत्री मंडळाचा पदग्रहण शपथविधी सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. शाळेतील पात्र तरुण प्रतिभांना त्यांच्या वचनबद्ध तीने आत्मविश्वासाने आणि क्षमतेने त्यांच्या शाळेचे नेतृत्व करण्यासाठी जबाबदाऱ्या प्रदान करण्यासाठी शाळेमध्ये हा समारंभ आयोजित करण्यात आला होता.
या समारंभाचे अध्यक्षस्थान संस्थेचे चेअरमन मा.सुनीलकुमार कासलीवाल यांनी भूषविले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने तसेच भगवान महावीर ,माता सरस्वती व स्व. माणिकचंद कासलीवाल यांच्या प्रतिमा पूजनाने झाली.लहान मुलांच्या अत्यंत मंत्रमुग्ध करणाऱ्या स्वागत गीताने, विद्यार्थिनींनी अभिनयासह नृत्य सादर करीत तसेच मनमोहक गाण्यांनी समारंभाची शोभा वाढवली. शालेय क्रीडा शिक्षक अशोक बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय मंत्रिमंडळ हाऊस कॅप्टन व त्यांच्या टीमने संचलन केले.
त्यानंतर शाळेचे नवनिर्वाचित प्रेसिडेंट, व्हाइस प्रेसिडेंट सेक्रेटरी, जाॅइन सेक्रेटरी, हेड बॉय, हेड गर्ल, डेप्यूटी हेड बाॅय, हेड गर्ल तसेच होम मिनिस्टर, कल्चरल मिनिस्टर, स्पोर्ट मिनिस्टर ,लिटरेरी मिनिस्टर ,डिसिप्लिन मिनिस्टर, हाऊस कॅप्टन (रेड,ग्रीन,येलो,ब्ल्यू), यांना मान्यवरांच्या हस्ते बॅज, सॅश आणि ध्वज देऊन गौरविण्यात आले.

हा तो प्रसंग होता जेव्हा तरुण विद्यार्थ्यांनी नेतृत्वाने आवरण धारण करून शाळेने त्यांना दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी सर्व तयारी केली होती. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण रोखण्यासाठी आणि त्यांना प्रशासकीय संस्थेचा एक महत्त्वाचा आणि अविभाज्य भाग असल्याची जाणीव करून देण्यासाठी दरवर्षी विद्यार्थी परिषदेची स्थापन करून हा समारंभ आयोजित केला जातो.यानंतर शपथविधी समारंभ पार पडला.
शपथविधी सोहळ्याचे नेतृत्व संस्थेचे चेअरमन मा. सुनील कुमार कासलीवाल यांनी केले तर गव्हर्नर म्हणून शाळेतील शिक्षक अँथनी नायडू यांनी काम पाहिले. शाळेच्या मंत्रिमंडळाने व हाऊस कॅप्टनने तसेच वर्ग प्रतिनिधींनी निष्ठेने काम करून शाळेचा सन्मान व गौरव राखण्याचा संकल्प यावेळी केला. हेडबॉय यथार्थ नाईक व हेड गर्ल नयना जाधव यांनी निवडून आलेल्या सदस्यांसमवेत सत्य व निष्ठेने काम करण्याची शपथ घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिन्सिपॉल मणी चावला यांनी केले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन सुनीलकुमार कासलीवाल, सेक्रेटरी विजय चोपडा, सौ.प्रमिलाताई कासलीवाल विश्वस्त रिखबचंद कासलीवाल, महेंद्र चांदीवाल, जुगलकिशोर अग्रवाल, प्रिन्सिपॉल श्री.मनी चावला, मुख्याध्यापक गोरख डफाळ ,विशाल सावंत तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments