किसान माध्यमिक विद्यालयात पारितोषिक वितरण संपन्न

 Bay- team aavaj marathi 

विजय जी चोपडा जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित किसान माध्यमिक विद्यालय वाखारी येथे वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण उत्साहात पार पडले. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयाचे माजी विद्यार्थी भरत अहिरे हे होते. त्यांनी याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांसाठी सुग्रास भोजन दिले. विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि शाळेच्या रंगमंचावर आकर्षक डोम बांधून देण्याचे जाहिर केले.

शालेय समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार विजय चोपडा हे अध्यक्षस्थानी होते. शाळा ग्रामीण भागातील असूनही मोठ्या प्रमाणावर उपक्रमांचे आयोजन आणि विविध क्षेत्रात विद्यार्थ्यांची होणाऱ्या प्रगती बाबत आनंद व्यक्त केला.

अभ्यासाबरोबरच तालुका क्रीडा स्पर्धेतील यश आणि नाट्य स्पर्धेतील जिल्हा पातळीवर मिळालेल्या यशाबद्दल त्यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांचे कौतुक केले. नांदगावचे माजी मुख्याध्यापक रंगकर्मी प्रभाकर काकळीज यांनी एकांकिकेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना आणि सर्व शिक्षकांना पेन बक्षीस दिले.

वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम आणि वैयक्तिक आणि सांघिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन विद्यालयात करण्यात आलेले होते. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांचे हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. 

श्री पुरोहित एकांकिका स्पर्धेतील सर्व कलाकारांना कंपास साहित्य बक्षीस देऊन गौरविण्यात आले. या कौतुक सोहळ्यासाठी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष मनीष चव्हाण, विद्यालयाचे माजी शिक्षक पोपट चव्हाण आणि पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यालयाचे माजी विद्यार्थी कैलास संतोष काकळीज यांचे तर्फे दर वर्षी पाचवी ते दहावीतील पहिल्या दोन विद्यार्थ्यांना रोख रक्कम पाच हजार बक्षीस स्वरूपात दिली जाते. तसेच विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक संजय दीक्षित यांचे तर्फे रोख रक्कम एक हजार पाचशे बक्षीस स्वरूपात दिली जाते. विद्यालयातर्फे सर्व दानशूर व्यक्तींचे शिक्षक प्रतिनिधी सुनील हिंगमीरे यांनी आभार मानले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक आणि पाहुण्यांचा सत्कार मुख्याध्यापक खंडू खालकर, पाहुण्यांचा परिचय सुनील हिंगमीरे, वार्षिक अहवाल वाचन ज्योत्स्ना चव्हाण, सूत्रसंचालन रत्नप्रभा पाटील, उपस्थितांचे आभार नंदू दवांगे यांनी मानले. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशांत वाघ, दिलीप भडांगे, योगेश कुलकर्णी, स्वप्निल महाले यांनी प्रयत्न केले.


Post a Comment

0 Comments