एका लोकप्रिय दैनिक च्या कार्यकारी संपादकांसोबत अत्यंत अर्वाच्च भाषेत गैरवर्तन करणाऱ्या सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज दाभाडे यांच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी आज २७ मार्च रोजी दैनिक वृत्तपत्र वार्ताहर संघाच्या वतीने उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की,२३ मार्च रोजी दारव्हा कारंजा महामार्गावरील भुलाई टोलनाका बंद करण्यासाठी महाविकास आघाडीने आंदोलन केले होते. या आंदोलनाच्या वृत्त संकलनासाठी जिल्ह्यातील विविध माध्यमांचे प्रतिनिधी घटनास्थळी उपस्थित होते. यावेळी पोलिसांनी सुरक्षेसाठी बॅरिकेड्स लावले होते. मात्र, पत्रकारांनी आपली ओळख पटवून दिल्यानंतर त्यांना टोलनाक्यापर्यंत जाण्याची परवानगी देण्यात आली होती. आंदोलनस्थळी परिस्थिती शांत असतानाही कर्तव्यावर तैनात असलेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज दाभाडे यांनी अचानक आक्रमक पवित्रा घेतला..
त्यांनी तेथील नागरिक आणि पत्रकारांना शिवीगाळ करत हाकलून देण्यास सुरुवात केली. यावेळी संपादक पत्रकार केशव सवळकर यांनी आपली ओळख देत ओळखपत्र दाखवून आपण पत्रकार असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, दाभाडे यांनी त्यांचा हात जोरात पकडून त्यांना धक्काबुक्की केली. पत्रकाराची मुस्कटदाबी करून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा अपमान करणाऱ्या दाभाडे यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे यावेळी दैनिक वृत्तपत्र वार्ताहर संघाचे अध्यक्ष साहेबराव धात्रक, सचिव लक्ष्मीकांत नंदनवार, निलकंठ धोबे, व्यंकटेश पेन्शनवार,शैलेश ताजवे, अविनाश मुन्नरवार, ताहेर मिर्झा, संतोष कलाने, अजय कानडे, गजानन भारती, अजहर उल्ला खान, वसंत देशमुख, प्रशांत भागवत, बाळासाहेब ओझलवार, भीमराव नगारे,डॉ विशाल माने, सलमान खान, संजय देशमुख,अरुण बेले,रवी भोयर,डॉ. शिवचरण हिंगमिरे, अंकुश पानपट्टे,आदी पत्रकार उपस्थित होते.
0 Comments