ऊसाला पाणी भरताना रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

 Bay- team aavaj marathi 

Dr. शिवचरण हिंगमिरे पत्रकार उमरखेड (यवतमाळ)       

 ऊसाला पाणी देण्याचे काम करीत असलेल्या शेतकऱ्यावर अचानक समोर आलेल्या रानडुकराने हल्ला करुण गंभीर जखमी केल्याची घटना उमरखेड तालुक्यातील चालगणी गाव 
येथे दरम्यान घडली आहे. घटनेत गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव दत्ता भगवान शिंदे असुन तो आपल्या शेतात ऊस पिकाला पाणी देण्याचे काम करीत होता. परंतु अचानक समोर आलेल्या रानडुकराच्या कळपातील डुकराने त्यांच्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले. 

सुदैवाने शेजारी काम करीत असलेल्या परिसरातील इतर शेतकऱ्यांच्या निदर्शनास रानडुक्कर शेजाऱ्यावर  रानडुक्कर हल्ला करीत असल्याचे दिसून येताच त्यांनी प्रचंड आरडा ओरडा करून जखमी शेतकरी शिंदे यांना रानडुक्कराच्या तावडीतुन सोडवले. गंभीर दुखापत झाल्याने जखमीस स्थानीक नागरीकांच्या मदतीने तात्काळ उमरखेड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

 परिसरात वन्य प्राण्यांनी धुमाकुळ घातला असुन पिकाच्या नासाडी सह मानवी जीवाला धोकादायक परिस्थिती निर्माण होण्याच्या घटनेत  सातत्याने वाढ होत असल्याने शेतकरी आणि शेतीवर काम करणाऱ्या मजूर वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असुन, वन विभागाने शेतशिवरात उच्छाद मांडणाऱ्या वन्य प्राण्यांचा तात्काळ बंदोबस्त करून घटनेत जखमी झालेल्या शेतकऱ्यास भरीव अर्थिक मदत द्यावी अशी मागणी ने जोर धरला आहे.

Post a Comment

0 Comments